tv9 Marathi Special Report | औकातीत राहा… पिसाळलेल्या कुत्र्यांचा… नाईक-शिंदे वादात या महिला नेत्याची उडी; जोरदार प्रत्युत्तर

tv9 Marathi Special Report | औकातीत राहा… पिसाळलेल्या कुत्र्यांचा… नाईक-शिंदे वादात या महिला नेत्याची उडी; जोरदार प्रत्युत्तर

| Updated on: Jan 27, 2026 | 12:17 PM

नवी मुंबई महापालिकेची निवडणूक जरी संपली असली तरी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप नेते गणेश नाईक यांच्यातील वाद अजून सुरूच आहे. भाजपने परवानगी दिली तर शिंदे गटाचं नामोनिशाण मिटवू, असा थेट इशारा गणेच नाईक यांनी दिला आहे. यावर शिंदेंच्या शिवसेनेच्या ज्योती वाघमारे यांनी तेवढ्याच तिखट शब्दात नाईक यांचा समाचार घेतला.

नवी मुंबई महापालिकेची निवडणूक जरी संपली असली तरी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप नेते गणेश नाईक यांच्यातील वाद अजून सुरूच आहे. भाजपने परवानगी दिली तर शिंदे गटाचं नामोनिशाण मिटवू, असा थेट इशारा गणेच नाईक यांनी दिला आहे. यावर शिंदेंच्या शिवसेनेच्या ज्योती वाघमारे यांनी तेवढ्याच तिखट शब्दात नाईक यांचा समाचार घेतला. औकातीत राहा, पिसाळलेल्या कुत्र्याचं बंदोबस्त करू, असं प्रत्यत्तर ज्योती वाघमारे यांनी दिलं आहे. नवी मुंबई महापालिकेत भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेची युती झाली नाही. या ठिकाणी भाजपने एकहाती सत्ता मिळवली आहे. प्रचारादरम्यान शिंदेनी नाईकांचा टांगा पलटी, घोडे फरार करण्याची भाषा केली होती. पण नवी मुंबईमध्ये नाईकांना आपला दबदबा कायम ठेवला. आता ठाणे आणि कल्याणवरून नाईकांनी शिंदेंवर आरोप केले आहेत. ठाणे आणि कल्याण डोंबिवलीत शिंदेंच्या घोड्यांचे लगाम ओढले गेले, अशी टीका नाईकांनी केली आहे. महायुतीत सत्तेत एकत्र असले तरी, एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक यांच्यामध्ये अजिबात जमत नाही. वाद एवढा टोकाला गेलाय की नामोनिशाण मिटवण्यापर्यंत हे प्रकरण पोहचलं आहे.

Published on: Jan 27, 2026 12:17 PM