Eknath Shinde : ‘माझ्या नातवाला शेतीची आवड आहे..’, एकनाथ शिंदे नातवासोबत शेतात रमले
DCM Eknath Shinde With Grandson : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज आपल्या दरे या गावी गेलेले आहेत. यावेळी त्यांनी आपल्या नातवासोबत शेतात पाहणी करून वृक्षारोपण केलं.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज आपल्या दरे या गावी गेलेले आहेत. यावेळी त्यांनी आपल्या नातवासोबत वृक्षारोपण केलं. निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवता यावा आणि नातवाला शेतीच, झाडांचं महत्व कळाव यासाठी मुख्यमंत्र्यांनी स्वत: आपल्या नातवासोबत शेतात वृक्षारोपण केलं.
यावेळी बोलताना शिंदे म्हणाले की, माझ्या नातवाला शेतीची आवड आहे. त्याला मातीची आवड आहे. आम्ही गावी आलो की तो कायम शेतात येण्यासाठी हट्ट करतो. त्याने देखील भाज्यांची रोपं लावली आहे. त्यामुळे शाळेतूनच मुलांना शेताची आवड निर्माण व्हावी म्हणून आता शालेय शिक्षणाच्या माध्यमातून आम्ही शाळेच्या बाजूलाच छोटी परसबाग तयार करायची, मुलांना निसर्गाशी जोडायचं यासाठी आम्ही प्रयत्न करत आहे, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिली आहे.
Published on: Apr 18, 2025 02:36 PM
