संजय राऊतांचा फोटो थेट रेड्याच्या गळ्यात, शिंदेंच्या शिवसेनेचं कुठं अनोखं आंदोलन?
शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांच्या विरुद्ध आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांचा फोटो रेड्याच्या गळ्यात टांगून जळगावमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून आज अनोखं आंदोलन करण्यात आलं आहे.
शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांच्या विरुद्ध आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांचा फोटो रेड्याच्या गळ्यात टांगून जळगावमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून आज अनोखं आंदोलन करण्यात आलं आहे. संजय राऊत यांना रेड्याची उपमा देत त्यांचा फोटो रेड्याच्या गळ्यात घालून शिवसेनेच्या वतीने हे आंदोलन करण्यात आलं आहे. या अनोख्या आंदोलनाच्या माध्यमातून आक्रमक झालेल्या शिवसेनेच्या वतीने संजय राऊत यांचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला आहे. जळगाव येथील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून संजय राऊत यांचा फोटो रेड्याच्या गळ्यात घालून रेड्याला काही अंतरापर्यंत चालवण्यात येऊन हे अनोखे आंदोलन करण्यात आलं आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत एक पदासाठी दोन मर्सिडीज द्यावा लागत होत्या, असे खळबळजनक विधान नीलम गोऱ्हे यांनी केल्यानंतर ठाकरे गट चांगलाच आक्रमक झाला. यानंतर संजय राऊतांनी नीलम गोऱ्हे निर्लज्ज आणि विकृत बाई असल्याचे वक्तव्य केले. यावरूनच शिंदेंची शिवसेना देखील ठाकरे गट आणि संजय राऊत यांच्यावर आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.
