Ajit Pawar : खिशात पैसे घेऊन फिरत नाही… दादांचं सेनेला उत्तर तर शिंदेंच्या नेत्यांच्या सावध प्रतिक्रिया, कुरबुरी असतात पण…
‘आदिवासी समाज असेल, मागासवर्गीय समाज असेल, या प्रकारे मी निधीचं वाटप करत असतो. त्याचं सूत्र आपण सर्वांनी स्वीकारलं आहे. काही लोक जाणीवपूर्वक आपलं सरकार आल्यापासून बदनामी करत आहेत. ‘, असं अजित पवार म्हणाले होते.
अजित पवार निधी देत नाहीत, असं काहीजण म्हणतात. पण मी पैसे खिशात घेऊन बसतो का? असा सवाल राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवर अजित पवार यांनी अप्रत्यक्षपणे हे वक्तव्य केले. तर अजित पवार यांनी केलेल्या या वक्तव्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील नेत्यांच्या सावध प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. नाराजी नाही, कुरबुरी असतात पण त्याचं भांडवल नको, असं प्रताप सरनाईक म्हणाले. तर दुसरीकडे नाराजी नाही दादांशी कालच चर्चा झाली आहे, असं संजय शिरसाट यांनी म्हटलंय. ‘राज्य सरकारने अर्थसंकल्प सादर केल्यानंतर पहिल्या तिमाहीत २० टक्के पैसे सोडतो दुसऱ्या तिमाहीत ४० टक्के तिसऱ्या तिमाहीत ६० टक्के नंतर ८० टक्के आणि शेवटी १०० टक्के पैसे सोडतो असं ते नियोजन असतं’, असं अजित पवार म्हणाले होते.
Published on: Jun 11, 2025 08:12 PM
