‘उबाठाचा फोफाटा झालाय’, शिंदेंच्या शिवसेनेतील आमदाराचा हल्लाबोल
हिंगोली येथील विद्यमान खासदार हेमंत पाटील यांना तिकीट मिळणार आणि तेच खासदार होणार असल्याची प्रतिक्रिया आमदार संतोष बांगर यांनी दिली. ते म्हणाले, 2024 च्या लोकसभेचे उमेदवार हेमंत पाटील हेच राहणार...
हिंगोली, १० मार्च २०२४ : हिंगोलीत आज शासन आपल्या दारी कार्यक्रम पार पडत आहे. या कार्यक्रमाला पन्नास हजार लाभार्थ्यांना वेगवेगळ्या प्रकारचा लाभ दिल्याचे खासदार हेमंत पाटील यांनी सांगितले तर शिंदे यांच्या शिवसेनेतील आमदार संतोष बांगर यांनी लोकसभेच्या 18 जागेवरती दावा केलेला आहे. हिंगोली येथील विद्यमान खासदार हेमंत पाटील यांना तिकीट मिळणार आणि तेच खासदार होणार असल्याची प्रतिक्रिया आमदार संतोष बांगर यांनी दिली. ते म्हणाले, 2024 च्या लोकसभेचे उमेदवार हेमंत पाटील हेच राहणार असून आणि हेमंत पाटील निवडून येणार असा विश्वासही संतोष बांगर यांनी व्यक्त केला. यावेळी संतोष बांगर यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना यावरही जोरदार हल्लाबोल केला. उबाठावर टीका करताना संतोष बांगर यांनी उबाठाचा फोफाटा झालाय असे म्हणत घणाघाती टीका केली.
Published on: Mar 10, 2024 04:36 PM
