Mahayuti : शिंदे हे जनतेच्या मनातले मुख्यमंत्री, धैर्यशील मानेंच्या विधानावर महायुतीच्या नेत्यांच्या संमिश्र भावना

Mahayuti : शिंदे हे जनतेच्या मनातले मुख्यमंत्री, धैर्यशील मानेंच्या विधानावर महायुतीच्या नेत्यांच्या संमिश्र भावना

| Updated on: Apr 07, 2025 | 12:17 AM

Mahayuti Politics News : धैर्यशील माने यांनी आज एका कार्यक्रमात बोलताना एकनाथ शिंदे हे जनतेच्या मनातले मुख्यमंत्री असल्याचं म्हंटलं आहे. त्यावर महायुतीच्या नेत्यांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या जात आहेत.

एकनाथ शिंदे हे जरी रेकॉर्डवर उपमुख्यमंत्री असले तरी जनतेच्या मनातील ते मुख्यमंत्रीच आहेत, असं वक्तव्य खासदार धैर्यशील माने यांनी केलं आहे. त्यावर नारायण राणे यांना विचारणा झाली असता, त्यांनी माध्यमांना आग न लावण्याचा सल्ला दिला आहे. तर भाजपच्या गिरीश महाजन यांनी यात काहीही वावग नसल्याचं म्हंटलं आहे.

धैर्यशील माने यांनी आज एका कार्यक्रमात बोलताना एकनाथ शिंदे हे अजूनही जनतेच्या मनातील मुख्यमंत्री असल्याचं म्हंटलं आहे. त्यावर आता खुद्द महायुतीच्या नेत्यांकडूनच वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. त्यावर नारायण राणे यांना प्रश्न विचारला असता, असे प्रश्न विचारून आग लावायचे काम करू नका. मी काय आज राजकारणात आलेलो नाही, असा सल्ला राणे यांनी माध्यमांना दिला आहे. शिंदे साहेब देखील गेल्या 50 वर्षांपेक्षा जास्त काळ राजकारणात आहेत. त्यानंही बर वाईट समजतं,असंही राणे म्हणाले. दुसरीकडे भाजप नेते गिरीश महाजन यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हंटलं की, यात वावगं काहीही नाही. ते जनतेच्या मनातले मुख्यमंत्री असतील. पण सध्या रेकॉर्डवर देवेंद्रजी फडणवीस हे मुख्यमंत्री आहेत.

Published on: Apr 07, 2025 12:17 AM