नागपुरात भिकारी बंदी कागदावरच का? बंदी घालणाऱ्यांच्या समोरचं भिकारी

| Updated on: Mar 10, 2023 | 10:53 AM

चौकांमध्ये भीक मागणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे निर्देश पोलिसांनी जारी केले होते.

Follow us on

नागपूर : राज्याच्या उपराजधानीत जी-२० च्या पार्श्वभूमीवर भिकारी बंदी करण्यात आली होती. शहरात वाहतूक सिग्नल व रस्त्याच्या कडेला तसेच महत्त्वाच्या सार्वजनिक ठिकाणी उभे राहून भीक मागताच येणार नाही. नागपूर पोलिसांना या भिकाऱ्यांविरोधात मोहीम सुरू केली आहे. चौकांमध्ये भीक मागणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे निर्देश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी जारी केले होते. मात्र भिकारी बंदीच्या आदेशानंतर सुद्धा पोलिसांना भीक मागताना दिसले. नागपुरात भिकारी बंदी कागदावरच का? असा सवाल आता नागरिक विचारू लागलेत सरकारी कार्यालय परिसरातील भिकाऱ्यांवर कारवाई कधी असाही सवाल सुद्धा नागरिकांकडून केला जातो.