काँग्रेस जिंकते त्या ठिकाणी मशीनला दोष देत नाही; PADUच्या वादावर भाजपचं प्रत्युत्तर
मशीनवर दोष देणे म्हणजे, काँग्रेस, ठाकरे गट, मनसे गट यांच्या पराभवाची तयारी आहे. ज्या ठिकाणी काँग्रेस जिंकते त्या ठिकाणी मशीनला दोष देत नाही. निवडणुकीच्या पराभवाची तयारी ठाकरे बंधू करत आहेत असंही बावनकुळे म्हणाले.
महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाकडून EVM मशीनला लावण्याकरिता नवीन यूनिट (PADU) तयार करण्यात आलंय. हे मशीन नेमकं काय आहे? हे जनेतला माहीत नाही. निवडणूक आयोगाने हे कोणाला दाखवलं देखील नाही. त्यांना हवं ते करत आहेत, असा आरोप मनसे पक्ष प्रमुख राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर केला होता. निवडणुकीच्या तोंडावर रोजच्या रोज कायदे बदलत आहेत. हा काय प्रकार आहे? असा सवाल ठाकरे यांनी उपस्थित केला होता.
यावर प्रत्युत्तर करत भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, मशीनवर दोष देणे म्हणजे, काँग्रेस, ठाकरे गट, मनसे गट यांच्या पराभवाची तयारी आहे. ज्या ठिकाणी काँग्रेस जिंकते त्या ठिकाणी मशीनला दोष देत नाही. निवडणुकीच्या पराभवाची तयारी ठाकरे बंधू करत आहेत असंही बावनकुळे म्हणाले.
Published on: Jan 14, 2026 04:03 PM
