Fadnavis on thackeray | फडणवीसांचं हनुमान चालिसा म्हणत ठाकरे सरकारला आव्हान

Fadnavis on thackeray | फडणवीसांचं हनुमान चालिसा म्हणत ठाकरे सरकारला आव्हान

| Updated on: Apr 25, 2022 | 7:39 PM

ज्या प्रकारे हे सरकार वागत आहे हे अत्यंत दुर्देवी आहे. नवनीत राणा यांना कस्टडीमध्ये अत्यंत हीन वाईट वागणूक दिली. त्यांना प्यायला पाणी दिलं नाही. वॅाशरूमला जाऊ दिलं नाही. याबद्दल त्यांच्या वकिलामार्फत त्यांनी तक्रार केली आहे. कस्टडीमध्ये अशाप्रकारे हिन वागणूक दिली जातेय, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

मुंबई : आमदार रवी राणा आणि नवनीत राणा यांना अटक आणि न्यायालयीन कोठडीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशआणा साधला. राणांसोबत काय सुरुंय. त्यांनी नेमक काय बोलले होते ? हनुमान चालिसा महाराष्ट्रात नाही तर काय पाकिस्तानात जाऊन म्हणायची का ? आजीकडे गेल्यावर आजीन काय सुनावलंय ते आपण आधीच बघितलं आहे, त्याबद्दल मी बोलत नाही. हनुमान चालिसा म्हणल्यामुळे राजद्रोहाचा गुन्हा दाखल होतो, असे बोलतच देवेंद्र फडणवीस यांनी हनुमान चालिसा पठण करीत आता आमच्यावर राजद्रोह लावा असे म्हटले आहे. ज्या प्रकारे हे सरकार वागत आहे हे अत्यंत दुर्देवी आहे. नवनीत राणा यांना कस्टडीमध्ये अत्यंत हीन वाईट वागणूक दिली. त्यांना प्यायला पाणी दिलं नाही. वॅाशरूमला जाऊ दिलं नाही. याबद्दल त्यांच्या वकिलामार्फत त्यांनी तक्रार केली आहे. कस्टडीमध्ये अशाप्रकारे हिन वागणूक दिली जातेय, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.