आघाडी सरकारने 14 कारणं देत…मिसिंग लिंकचा फडणवीसांनी इतिहास मांडला, विरोधकांना घेरलं!

आघाडी सरकारने 14 कारणं देत…मिसिंग लिंकचा फडणवीसांनी इतिहास मांडला, विरोधकांना घेरलं!

| Updated on: Jul 08, 2026 | 3:01 PM

पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले. मुंबई-पुणे मिसिंग लिंक प्रकल्पावरून विरोधकांकडून करण्यात आलेल्या आरोपांवर बोलताना त्यांनी महायुती सरकारने धाडसाने हा प्रकल्प पूर्ण केल्याचे सांगितले. तसेच याआधीच्या आघाडी सरकारने 14 कारणे देत या प्रकल्पाची फाईल बंद केल्याचा आरोपही त्यांनी केला.

मात्र, त्यांच्या भाषणातील सर्वाधिक चर्चेचा विषय ठरला तो म्हणजे त्यांनी केलेले एक विधान. “फडणवीसांना म्हणजे मला शिव्या द्या, मला त्याची सवय आहे. मी शिव्या प्रुफ आहे. पण महाराष्ट्राला बदनाम कराल तर मी सोडणार नाही,” असा इशारा त्यांनी विरोधकांना दिला.

राजकीय टीका आणि वैयक्तिक आरोप यामध्ये फरक असल्याचेही त्यांनी अप्रत्यक्षपणे स्पष्ट केले. स्वतःवर होणारी टीका सहन करेन, मात्र राज्याच्या प्रतिमेला धक्का पोहोचवण्याचा प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली. त्यांच्या या वक्तव्याची राज्याच्या राजकारणात मोठी चर्चा सुरू झाली आहे.

Published on: Jul 08, 2026 3:00 PM
Follow Us