CM Devendra Fadnavis : राहुल गांधींसोबत चर्चा करण्यासाठी आमचा कार्यकर्ताच पुरेसा; फडणवीसांचा खसपूर टोला

CM Devendra Fadnavis : राहुल गांधींसोबत चर्चा करण्यासाठी आमचा कार्यकर्ताच पुरेसा; फडणवीसांचा खसपूर टोला

| Updated on: Jun 10, 2025 | 4:39 PM

BJP Government : केंद्रातील सत्तेला ११ वर्षे पूर्ण झाल्याने भाजप दिल्लीतील भारत मंडपम येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली उत्सव साजरा करण्याची तयारी करत आहे.

रोज खोटे बोला, हीच राहुल गांधी यांची नीती आहे. यामुळे लोकांच्या मनात काही कन्फ्युजन निर्माण होण्याची शक्यता त्यांना वाटत आहे. राहुल गांधी यांना त्यांच्या प्रत्येक मुद्द्याचे उत्तर दिलेले आहे. त्यावर ते एकही उत्तर देऊ शकले नाही. निवडणूक प्रक्रियेमध्ये प्रत्येक टप्यावर प्रत्येक पक्षाचा प्रतिनिधी उपस्थित असतो, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटलं आहे. केंद्रातील सत्तेला ११ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त, भाजप दिल्लीतील भारत मंडपम येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली उत्सव साजरा करण्याची तयारी करत आहे. भाजपशासित राज्यांचे नेतेही याबद्दल खूप उत्साही आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबद्दलची माहिती आज पत्रकारांशी बोलताना दिली आहे.

यावेळी पुढे बोलताना फडणवीस म्हणाले की, राहुल गांधी यांच्या प्रत्येक प्रश्नाचे पुराव्यासहित उत्तर दिलेले आहे. राहुल गांधी यांच्यासोबत डिबेट करण्याकरता माझी गरजच नाही. त्यासाठी आमचा कार्यकर्ता देखील पुरेसा आहे. काँग्रेस पक्षाच्या सेलने याआधी देखील माहितीच्या अधिकारात त्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तर मागितली आहेत. या माध्यमातून निवडणूक आयोगाने देखील काँग्रेस पक्षाचे तोंड बंद केले असल्याचे फडणवीस यांनी म्हंटलं आहे.

Published on: Jun 10, 2025 04:39 PM