Akola | बोगस बियाण्यांनी घात केला! शेतात अंकुरच फुटला नाही; हजारो शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट

Akola | बोगस बियाण्यांनी घात केला! शेतात अंकुरच फुटला नाही; हजारो शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट

| Updated on: Jul 08, 2026 | 4:21 PM

अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यात निकृष्ट दर्जाच्या बियाण्यांमुळे शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे. खरीप हंगामासाठी मोठ्या आशेने सोयाबीन, तूर आणि कपाशीची पेरणी केलेल्या अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पेरणीनंतर दोन आठवडे उलटूनही बियाण्यांना साधा अंकुरही फुटलेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून, कृषी विभागाकडे मोठ्या प्रमाणात तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, अनेक शेतकऱ्यांनी कर्ज काढून बियाण्यांची खरेदी केली होती. मात्र, बियाणे उगवले नसल्याने आता त्यांच्यावर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. यामुळे बियाणे, मजुरी, खते आणि मशागतीचा दुहेरी खर्च सहन करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

दरम्यान, निकृष्ट बियाण्यांचा हा मुद्दा राज्याच्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनातही गाजला. भाजप आमदार हरिष पिंपळे यांनी विधानसभेत हा प्रश्न उपस्थित करत दोषी बियाणे कंपन्यांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली. तसेच संबंधित कंपन्यांच्या बियाण्यांची विक्री त्वरित बंद करण्यात यावी आणि बाधित शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.

याशिवाय, ज्या कंपन्यांच्या बियाण्यांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे, त्या कंपन्यांविरोधात फौजदारी गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करावी, तसेच ज्या शेतांमध्ये बियाणे उगवले नाहीत त्या शेतांचे तातडीने शासकीय पंचनामे करून बाधित शेतकऱ्यांना शासन आणि संबंधित बियाणे कंपन्यांकडून त्वरित आर्थिक मदत व नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी आणि लोकप्रतिनिधींनी केली आहे.

Published on: Jul 08, 2026 4:21 PM
Follow Us