Yeola News : शेतकरी कर्जमाफीसाठी येवल्यात बैलगाडी मोर्चा

Yeola News : शेतकरी कर्जमाफीसाठी येवल्यात बैलगाडी मोर्चा

| Updated on: Apr 07, 2025 | 4:14 PM

Yeola Bullock Cart Protest : राज्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात यावी यासाठी आज नाशिकच्या येवला तालुक्यात बैलगाडी मोर्चा काढण्यात आला.

राज्यात शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर विरोधक आक्रमक झालेले आहेत. शेतकऱ्यांना यंदा आणि पुढच्या वर्षी देखील कर्जमाफी दिली जाणार नाही असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हंटलं आहे. त्यानंतर अजित पवार यांची भूमिका ही सरकारची भूमिका असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटलं आहे. सध्या परिस्थिती नसल्याने कर्जमाफीचा मुद्दा हा विचाराधीन असल्याचं सरकारकडून सांगण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर आज ठीकठिकाणी आंदोलन करण्यात आलं. नाशिक जिल्ह्याच्या येवला तालुक्यात देखील आज छावा क्रांतिवीर सेनेच्यावतीने शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात यावी या मागणीसाठी बैलगाडी मोर्चा काढण्यात आला. यावेळी येवला कृषी उत्पन्न बाजार समितीपासून तहसील पर्यंत हा बैलगाडी मोर्चा काढण्यात आला. शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली नाही तर हा बैलगाडी मोर्चा मुंबई मंत्रालयावर देखील काढण्यात येईल असा इशारा आंदोलकांनी दिला.

Published on: Apr 07, 2025 04:14 PM