Sangali : धक्कादायक… रक्ताच्या थारोळ्यात महिला डॉक्टर, दवाखान्यात जाते सांगितलं अन्… सांगलीत खळबळ

Sangali : धक्कादायक… रक्ताच्या थारोळ्यात महिला डॉक्टर, दवाखान्यात जाते सांगितलं अन्… सांगलीत खळबळ

| Updated on: Jul 04, 2025 | 11:57 AM

सांगलीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुंबईत राहणाऱ्या डॉक्टर शुंभागी समीर वानखडे या महिलेने सांगली जिल्ह्यात धक्कादायक पाऊल उचललं आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

रक्ताच्या थारोळ्यात एक डॉक्टर महिला आढळून आल्याने सांगलीत एकच खळबळ उडाली आहे. हाताच्या नसा कापून या डॉक्टर महिलेने आपल्याच गाडीत आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर येतेय. या प्रकरणाची चौकशी ही निष्पक्ष, पारदर्शक आणि जलदगतीने व्हावी, अशी ठाम भूमिका विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांनी मांडली. या धक्कादायक प्रकरणावर बोलताना निलम गोऱ्हेंनी ही प्रतिक्रिया दिली. मुंबईत राहणाऱ्या डॉक्टर शुंभागी समीर वानखडे यांनी सांगली जिल्ह्यात आत्महत्या करून आपला जीव संपवला. वाळवा तालुक्यातील विठ्ठलवाडी गावच्या हद्दीत या महिलेने गाडीतच आत्महत्या केली. या डॉक्टर महिलेने हाताच्या आणि गळ्याच्या नसा ब्लेडने कापून आपला जीव संपवल्याची माहिती आहे. दवाखान्यात जाते असं सांगून ही महिला घरातून निघाली अन् हा सगळा प्रकार नंतर उघडकीस आला.

Published on: Jul 04, 2025 11:57 AM