सांगलीतल्या स्पर्धेत महिला कुस्तीपटूंसमोर अडचणींचा डोंगर, ढिसाळ नियोजनामुळं नाराजी

| Updated on: Mar 24, 2023 | 10:35 AM

VIDEO | महाराष्ट्राची पहिली महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा सांगलीत... विद्युत पुरवठा खंडीत असल्याने महिला केसरीतील मल्लांची रात्र अंधारात

Follow us on

सांगली : महाराष्ट्रात पुरुषांप्रमाणे पहिल्यांदाच महिलांची महाराष्ट्र केसरी स्पर्धा २३ मार्चपासून ही स्पर्धा सांगलीत सुरु झाली आहे. मात्र ही स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात सापडल्याचे समोर आले आहे. या स्पर्धेच्या संयोजकांनी आपली स्पर्धा उत्तम असल्याचा दावा केला असला तरी ढिसाळ नियोजनाचा फटका महिला कुस्तीपटूंना बसला आहे. या स्पर्धांसाठी राज्यातील जवळपास ४०० हून अधिक महिला स्पर्ध दाखल झाल्या आहेत. मात्र कुस्ती स्पर्धांच्या ठिकाणी अत्यंत ढिसाळ नियोजन पाहायला मिळाले आहे. ज्या क्रीडा संकुलाच्या आवारामध्ये कुस्ती स्पर्धा होत असल्याने त्या ठिकाणी स्ट्रीट लाईट चालू नाही. यामुळे अंधारातून वाट काढत महिला कुस्तीपटूंना बाहेर पडावे लागत होतं. याशिवाय या महिला कुस्तीपटूंचे जेवणाची योग्य सोय नाही, त्या ठिकाणी ही अत्यंत ढिसाळ अशा पद्धतीचे नियोजन असल्याने महिला कुस्तीपटूंमध्ये मोठी नाराजी दिसून येत आहे.