रत्नागिरीत मच्छिमारांची कसली धावाधाव? का करतायंत नौकांची आवराआवर?

| Updated on: May 22, 2023 | 10:56 AM

याचदरम्यान आता मान्सूनचे आगमन लवकरच होणार असल्याचा तर पुढील तीन दिवस मान्सूनपूर्व पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवला आहे. याचदरम्यान शेतकऱ्यांची मशागती लगबग सुरू असतानाच मात्र कोकणात कोळी बांधवांची देखील लगबग सुरू झाली आहे.

Follow us on

रत्नागिरी : मे महिना संपत आला असून राज्यभरातील शेतकऱ्यांसह (Farmers) अबालवृद्धांचं लक्ष यंदाच्या मान्सूनकडे लागलं आहे. यंदा मान्सून कधी दाखल होणार याबाबत वेगवेगळे अंदाज वर्तवण्यात येत आहे. याचदरम्यान आता मान्सूनचे आगमन लवकरच होणार असल्याचा तर पुढील तीन दिवस मान्सूनपूर्व पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवला आहे. याचदरम्यान शेतकऱ्यांची मशागती लगबग सुरू असतानाच मात्र कोकणात कोळी बांधवांची देखील लगबग सुरू झाली आहे. पावसाळी मासेमारी बंदीच्या पाश्वभूमीवर मच्छिमार नौकांची आवराआवर सुरु झालीय. पावसाळी मासेमारीला 1 जून पासून बंदी असणार आहे. नौकांची रंगरंगोटी, जाळी सुरक्षित ठिकाणी ठेवणे नौका समुद्रापासून वर आणून झाकून ठेवणे अशी कामे मच्छिमार करताना दिसतोय.