Dhananjay Munde : लाज वाटत नाही? मंत्रिपद काढायचं होतं की… ‘त्या’ प्रकरणावर बोलताना मुंडेंनी काढली भडास

Dhananjay Munde : लाज वाटत नाही? मंत्रिपद काढायचं होतं की… ‘त्या’ प्रकरणावर बोलताना मुंडेंनी काढली भडास

| Updated on: Jun 30, 2025 | 11:25 AM

पिडीतेने प्राध्यापक विजय पवार आणि प्रशांत खटावकर विरोधात शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. यावरुन गुन्हा नोंद करण्यात आला. या प्रकारामुळे बीडच्या शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे. यावरून धनंजय मुंडेंनी संताप व्यक्त केलाय.

बीडच्या उमाकिरण क्लासेसमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याप्रकरणी बीड शहरातील नामांकित क्लासेसच्या दोन प्राध्यापकांविरोधात शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुरुवारी रात्री बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक काद्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला. या प्रकारामुळे बीडच्या शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे. प्राध्यापक विजय पवार आणि प्रशांत खटावकर असे गुन्हा नोंद झालेल्यांची नावे आहेत.  या बीडमधील अप्लवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणी माजी मंत्री धनंजय मुंडे चांगलेच आक्रमक झालेत. देशमुख हत्या प्रकरणावेळी बोलणारा एकही नेता आता बोलत नाही. नेमका न्याय द्यायचा होता की मंत्रिपद काढायचं होतं? लाज वाटत नाही का? असा सवालच मुंडेंनी केलाय.

नेमकं प्रकरण काय?

१७ वर्षीय पिडिता ही बीड येथील एका नामांकित खासगी क्लासमध्ये शिकवणीसाठी येत होती. ती बारावीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. जुलै २०२४ मध्ये क्लास मधील शिक्षक प्रशांत खटावकर याने तिला क्लास सुटल्यानंतर आपल्या कक्षात बोलावून घेत तिच्याशी अश्लील चाळे केले. विद्यार्थिनीने ही बाब क्लासचे संचालक विजय पवार यांना सांगितली व त्यांच्याकडे मदत मागितली. मात्र पवार यांनी खटावकर याला आळा घालण्याऐवजी स्वतः या विद्यार्थिनीशी आपल्या कक्षात अश्लील चाळे केले. मे २०२५ पर्यंत हा प्रकार सुरु होता.

Published on: Jun 30, 2025 11:25 AM