Walmik Karad Video : हार्वेस्टरचा वाद अन् जरांगे पाटलांचा थेट वाल्मिक कराडला फोनकॉल, काय झालं संभाषण?
हार्वेस्टर अनुदान प्रकरणात वाल्मिक कराडने फसवणूक केल्याचा आरोप करणाऱ्या शेतकऱ्यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे धाव घेतली. तर दुसरीकडे काही महिन्यांपूर्वी वाल्मिक कराडचं गाऱ्हाणं घेऊन शेतकरी मनोज जरांगे पाटील यांच्याकडे गेले होते, अशीही माहिती समोर येत आहे.
बीड प्रकरणात आरोपी वाल्मिक कराड जेलमध्ये असला तरी त्याची टोळी शेतकऱ्यांना दमदाटी करत असल्याचे आरोप आता होऊ लागलेत. माध्यमांसमोर बोलणाऱ्या हार्वेस्टर मालकांना आता दमदाटी सुरू झाली आहे. हार्वेस्टर अनुदान प्रकरणात वाल्मिक कराडने फसवणूक केल्याचा आरोप करणाऱ्या शेतकऱ्यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे धाव घेतली. तर दुसरीकडे काही महिन्यांपूर्वी वाल्मिक कराडचं गाऱ्हाणं घेऊन शेतकरी मनोज जरांगे पाटील यांच्याकडे गेले होते, अशीही माहिती समोर येत आहे. मात्र तेव्हा देखील शेतकऱ्यांपुढे वाल्मिक कराडने अट ठेवल्याचा आरोपा आता होत आहे. राज्यातील शेतकऱ्यांना वाल्मिक कराड आणि दोन साथीदारांनी ११ कोटींचा गंडा घातल्याचा आरोप आहे. आरोपानुसार, हार्वेस्टर यंत्राना तात्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडून अनुदान मिळवून देतो, असं म्हणत जितू पालवे आणि सानप या दोन लोकांच्या माध्यमातून कारडने १४० शेतकऱ्यांकडून प्रत्येकी ८ लाख रूपये घेतले. पण अनुदान मिळालंच नाही. यानंतर विचारणा केल्यानंतर याच शेतकऱ्यांना कराडकडून दमदाटी आणि मारहाण केल्याचा आरोप होतोय. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट…
