दत्तक नाशिक ते तपोवनातील झाडांची कत्तल, ठाकरे बंधुंच्या टीकेवर फडणवीस करणार जोरदार प्रहार?

दत्तक नाशिक ते तपोवनातील झाडांची कत्तल, ठाकरे बंधुंच्या टीकेवर फडणवीस करणार जोरदार प्रहार?

| Updated on: Jan 11, 2026 | 2:40 PM

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज नाशिकमध्ये सभा आहे. नाशिकच्या गोदा काठावर ही सभा पार पडणार आहे. संपूर्ण नाशिककरांचे या सभेकडे लक्ष लागले आहे.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज नाशिकमध्ये सभा आहे. नाशिकच्या गोदा काठावर ही सभा पार पडणार आहे. संपूर्ण नाशिककरांचे या सभेकडे लक्ष लागले आहे. दोन दिवसांपूर्वी नाशिकमध्ये ठाकरे बंधूंची एकत्रित सभा पार पडली होती. ठाकरेंच्या सभेतून भाजपवर टीका, टिपण्या करण्यात आल्या होत्या. तपोवनमधील वृक्षांच्या कत्तलीवरूनही ठाकरे बंधूंनी भाजपवर हल्लाबोल केला होता. त्यामुळे आजच्या नाशिकच्या सभेतून फडणवीस काय उत्तर देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मागील महापालिका निवडणुकीला नाशिककरांनी भाजपच्या हातात सत्ता दिली होती. दत्तक नाशिकची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती त्यामुळे आज देखील फडणवीस काय बोलतात याकडे लक्ष आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक महानगरपालिका ही सर्वच पक्षांसाठी महत्त्वाची आहे. त्यामुळे सर्व पक्ष सभेसाठी जोर धरून आहेत. प्रचाराचा सुपर संडे हा आज नाशिकमध्ये पाहायला मिळणार आहे.

Published on: Jan 11, 2026 02:40 PM