Sindhutai Sapkal Funeral | सिंधु नावाचं वादळ अनंतात विलीन, पुण्यातील ठोसरपागेत अंत्यसंस्कार

Sindhutai Sapkal Funeral | सिंधु नावाचं वादळ अनंतात विलीन, पुण्यातील ठोसरपागेत अंत्यसंस्कार

| Edited By: | Updated on: Jan 05, 2022 | 9:57 PM

सिंधूताई सकपाळ यांनी महानुभव पंथाचा स्वीकार केला होता. त्यामुळे या पंथांच्या रूढी प्रमाणेच आपले अंत्यसंस्कार व्हावेत ही त्यांची इच्छा होती. त्यांच्या इच्छेनुसार त्यांचे पार्थीव दफन करण्याचा निर्णय घेतला.

पुणे : अनाथांची माय म्हणून आयुष्यभर अनाथ मुलांसाठी आयुष्य वेचलेल्या जेष्ठ समाजसेविका सिंधुताई सकपाळ यांचं ह्दयविकाराच्या झटक्यानं काल निधन झालं. त्यांच्यावर पुण्यातील ठोसर पागा स्मशानभूमीत अग्नीसंस्कार ऐवजी महानुभव पद्धतीनं अंत्यसंस्कार करत त्यांचे पार्थिव दफन करण्यात आले. माईंच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार न करता दफन का करण्यात आला यावर चर्चा सुरु झाल्या . त्यावर त्यांच्या संस्थेतील कर्मचाऱ्यांनी याबाबत माहिती दिली आहे. सिंधूताई सकपाळ यांनी महानुभव पंथाचा स्वीकार केला होता. त्यामुळे या पंथांच्या रूढी प्रमाणेच आपले अंत्यसंस्कार व्हावेत ही त्यांची इच्छा होती. त्यांच्या इच्छेनुसार त्यांचे पार्थीव दफन करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या अंतयात्रेदरम्यान चक्रधर स्वामींच्या नावाचा जप सुरु होता. तसेच श्रीमद्भागवत गीतेतील श्लोक यावेळी म्हणण्यात आले.