Kolsewadi Police Station Riot : कोळसेवाडी पोलीस ठाण्यातील राडा प्रकरणात गणपत गायकवाडांसह चार निर्दोष

Kolsewadi Police Station Riot : कोळसेवाडी पोलीस ठाण्यातील राडा प्रकरणात गणपत गायकवाडांसह चार निर्दोष

| Updated on: Sep 16, 2025 | 5:47 PM

2014 च्या कोळसेवाडी पोलीस ठाण्यातील राडा प्रकरणी महत्त्वाचा निकाल लागला आहे. कल्याण न्यायालयाने आमदार गणपत गायकवाड आणि इतर चार आरोपींना निर्दोष मुक्त केले आहे. गोळीबार प्रकरणात मात्र, आमदार गायकवाडांचा तुरुंगवास सुरूच राहणार आहे. हा निकाल राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरणार आहे.

2014 मध्ये कल्याण कोळसेवाडी पोलीस ठाण्यात झालेल्या राडा प्रकरणात एक महत्त्वाचा निकाल समोर आला आहे. 2014 मध्ये कल्याण कोळसेवाडी पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या केबिनमध्ये राडा केल्याचा गुन्हा पोलिसांनी दाखल केला होता. यात माजी आमदार गणपत गायकवाड, शिवसेना शहरप्रमुख निलेश शिंदेसह तीन जणांवर गुन्हा दाखल करत कल्याण न्यायालय सुनावणी सुरू होती. विशेष म्हणजे पोलिसांनी स्वतः हा गुन्हा नोंदवून दोषारोपपत्र दाखल केले होते. मात्र आज पुरावे अभावी कल्याण न्यायालयाने गणपत गायकवाड सह इतर चार ही आरोपींची निर्दोष मुक्तता केली. सध्या गणपत गायकवाड आणि कुणाल पाटील आजही उल्हासनगरमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या केबिनमध्ये माजी आमदार महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केल्याप्रकरणी कारागृहात आहे.

Published on: Sep 16, 2025 05:47 PM