Sachin Tendulkar | मास्टर ब्लास्टरने सचिनने केली बाप्पाची पूजा, सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर

| Updated on: Sep 11, 2021 | 8:26 AM

मास्टर ब्लास्टरने सचिन तेंडुलकरने केली बाप्पाची पूजा, सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर. या व्हीडिओत सचिन तेंडुलकर गणपतीच्या मूर्तीला हार घालताना दिसत आहे. अनेक सेलिब्रिटी आणि नेत्यांच्या घरी शुक्रवारी बाप्पाचे आगमन झाले होते. 

Follow us on

हाराष्ट्राचे आराध्य दैवत प्रथम पूजनीय गणपतीच्या गणेशोत्सवाला 10 सप्टेंबर गणेश चतुर्थीपासून सुरुवात झाली आहे. हा सण रविवार 19 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीपर्यंत असेल राहील. भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाची चतुर्थी गणेश चतुर्थी म्हणून साजरी केली जाते. असे मानले जाते की या दिवशी दुपारी गणपतीचा जन्म झाला होता. त्यांच्या जयंतीनिमित्त, गणेश चतुर्थीपासून अनंत चतुर्दशीपर्यंत भारताच्या सर्व भागात 10 दिवस गणेशोत्सव साजरा केला जातो. चतुर्थीच्या दिवशी बाप्पाचे भक्त गणपतीची मूर्ती त्यांच्या घरी आणतात आणि सकाळी, संध्याकाळी त्यांची विशेष पूजा करतात. श्रीगणेश दीड, 5, 7 किंवा 9 दिवस घरात विराजमान असतात. त्यानंतर त्यांचे विसर्जन केले जाते. आज दीड दिवसांच्या गणपतीचे विसर्जन होणार आहे.