Pune Ganpati Visarjan 2025 : लालबागच्या राजावर श्रॉफ बिल्डिंगजवळ पुष्पवृष्टी अन् बाप्पा गुलालानं न्हाहला
राजाच्या मूर्तीला श्रॉफ बिल्डिंगवरून पुष्पवृष्टी आणि गुलालाचा वर्षाव करण्यात आला. भारतीय सैन्य दलाच्या लढाऊ विमान राफेलच्या प्रतिकृतीने केलेल्या या अनोख्या वंदनेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
यंदाच्या वर्षीही लालबागच्या राजानं त्यांच्या भव्यतेने सर्वांना मोहित केलं आहे. दहा दिवस मनोभावे सेवा केल्यानंतर आज राज्यभरातील गणपती बाप्पांना निरोप दिला जात आहे. लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक हळू हळू पुढे सरकत आता श्रॉफ बिल्डिंगजवळ पोहोचली आहे. याच श्रॉफ बिल्डिंगवरून राफेलच्या प्रतिकृतीच्या माध्यमातून लालबागच्या राज्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली. यावेळी गुलालाचा वर्षाव करून बाप्पाला निरोप देण्यात येतोय. हा गुलालाचा वर्षाव झाल्यानंतर लालबागचा राजा अक्षरक्षः गुलालाने न्हाहून निघाला. श्रॉफ बिल्डिंगवरून पुष्पवृष्टी करणं ही लालबागची जुनी परंपरा आहे. या वर्षीच्या विसर्जनात ऑपरेशन सिंधूच्या यशाचे स्मरण करण्यासाठी ही राफेलची प्रतिकृती वापरण्यात आली. ही मिरवणूक अरबी समुद्रात गणपती विसर्जनाने संपली. १९३२ पासून लालबागचा राजा मुंबईकरांच्या श्रद्धेचे केंद्र आहे. या वर्षीच्या विसर्जनात मोठ्या संख्येने भाविक सहभागी झाले.
