Gautami Patil : मी मुंबईची फॅन, Love U… मुंबईकर म्हणजे…सबसे कातिल गौतमी पाटीलनं मागाठाण्याची दहीहंडी गाजवली

Gautami Patil : मी मुंबईची फॅन, Love U… मुंबईकर म्हणजे…सबसे कातिल गौतमी पाटीलनं मागाठाण्याची दहीहंडी गाजवली

| Updated on: Aug 16, 2025 | 4:36 PM

गौतमी पाटीलने मुंबईच्या मागाठाणे येथील दहीहंडी उत्सवात सलग तिसऱ्या वर्षी आपली उपस्थिती दर्शवून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. आमदार प्रकाश सुर्वे यांनी आयोजित केलेल्या या दहीहंडी उत्सवात गौतमीच्या डान्सने गोविंदा आणि प्रेक्षकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण केले.

ठाण्यातील दहीहंडी उत्सवाची देशभरात चांगलीच चर्चा असते. अशातच ठाण्यातील मागाठाणे येथील महायुती आणि तारामती चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित मागाठाणे दहीकाला गोविंदोत्सव 2025 ची यंदाही चर्चा झाली कारण यावेळीही सबसे कातिल प्रसिद्ध डान्सर गौतमी पाटील हिने हजेरी लावली होती. आमदार प्रकाश सुर्वे यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या या दहीहंडी महोत्सवात दिलखेचक अदा, चेहऱ्यावरील उत्साहाने मराठी गाण्यांवर ठुमके देत गौतमी पाटीलने गोविंदांचा उत्साह वाढवला. यावेळी टीव्ही ९ मराठीशी संवाद साधता गौतमी पाटील म्हणाली, ‘मी पहिल्यांदा आली होती तसंच प्रेम मला मुंबईकरांनी दिलंय. मुंबईकर म्हणजे लव्ह यू.. मुंबईमध्ये कोळीलोकं बरेच आहेत. मला त्यांची संस्कृती आणि पेहराव आवडतो. त्यामुळे मी यंदा तसंच पेहराव, तसा साज श्रृंगार केला’. गौतमी पाटीलने यापूर्वीही मुंबईकरांच्या प्रेमाचे कौतुक केले आहे. तिने या उत्सवातील सहभागामुळे दहीहंडीचा उत्साह अधिकच वाढला आहे.

Published on: Aug 16, 2025 04:36 PM