… म्हणून प्रसिद्ध नृत्यांगणा गौतमी पाटील हिचे चाहते झाले नाराज

| Updated on: May 30, 2023 | 9:21 AM

VIDEO | गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमावर पाणी, गौतमी पाटील हिचे चाहते का झाले नाराज?

Follow us on

पुणे, चाकण : गौतमी पाटील आणि गर्दी हे समीकरण ठरलेलंय. गौतमी जिथे जाते तिथे गर्दी होतेच होते. गौतमीचा डान्स म्हटला तर टांगा पलटी घोडे फरार अशी प्रेक्षकांची गर्दी असते. बऱ्याचदा गौतमीच्या कार्यक्रमात बसायला जागा नसते म्हणून कुणी झाडावर जाऊन बसतो तर कुणी घराच्या छतावर जाऊन गौतमीच्या दिलखेचक अदा न्याहाळताना दिसतो. गौतमीच्या कार्यक्रमात इतकी गर्दी असते की पोलिसांना जमावावर लाठीमार करावा लागतो. असे असताना पुण्यातील खेड तालुक्यातील मोई येथील गौतमीचे चाहते काहीसे नाराज झाल्याचे समोर आले आहे. खेड तालुक्यातील मोई येथे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त नृत्यांगना गौतमी पाटील हिचा कार्यक्रम आयोजित केला होता. मात्र कार्यक्रम सुरू होण्या अगोदरच जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली अन् सर्व चाहत्यांचा हिरमोड झाला. जोरदार वादळी वारा अन् पाऊस झाल्याने आयोजकांना गौतमीचा कार्यक्रम कार्यक्रम रद्द करावा लागला. यामुळे गौतमीच्या चाहत्यांमध्ये नाराजी पहायला मिळाली. विशेष म्हणजे गौतमीच्या कार्यक्रमाची सर्व तयारी होऊन कार्यक्रम होऊ शकला नाही नसल्याचे आयोजकांनी सांगितले.