सलग सुट्टयांमुळे शिर्डीत लाखो भाविक, दर्शनाला लांबच लांब रांग

| Updated on: Apr 09, 2023 | 9:32 AM

सध्या सलग सुट्टयांमुळे शिर्डीत भाविकांची अलोट गर्दी झाली असून सकाळपासुनच साई दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या आहेत. गेल्या तिन दिवसात लाखो भाविकांनी साईदर्शन घेतल असून रस्ते आणि बाजारपेठाही भाविकांच्या गर्दीने गेल्या फुलून गेल्या आहेत

सलग सुट्टयांमुळे शिर्डीत लाखो भाविक, दर्शनाला लांबच लांब रांग
Image Credit source: tv9
Follow us on

शिर्डी : गुड फ्रायडे, दुसरा शनिवार आणि रविवार अशा सलग सुट्ट्या लागून आल्याने राज्यातील पर्यटन स्थळांसह धार्मिक स्थळे ही लोकांनी गजबजून गेली आहेत. शिर्डीत लोकांच्या अलोट गर्दीने फुलून गेली आहे. फेब्रुवारी महिन्यातच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते शिर्डी दरम्यान वंदे भारत ट्रेन सुरू केल्याने अनेकांच्या प्रवासातील समस्या कमी झाली आहे. याचदरम्यान आता येथील विमान तळाला नाईट लँडिंगची सुविधा उपलब्ध झाल्याने विमान प्रवास देखिल सुखर झाला आहे.

सध्या सलग सुट्टयांमुळे शिर्डीत भाविकांची अलोट गर्दी झाली असून सकाळपासुनच साई दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या आहेत. गेल्या तिन दिवसात लाखो भाविकांनी साईदर्शन घेतल असून रस्ते आणि बाजारपेठाही भाविकांच्या गर्दीने गेल्या फुलून गेल्या आहेत. मात्र राज्यात कोरोनाचे संकंट वाढत असताना येथे मास्क सक्ती नाही किंवा तशी खबरदारी भाविक ही घेताना दिसत नाहीत.