काळे झेंडे दाखवण्याच्या लायकीचे ठाकरे सरकार, ST कर्मचारी संपावरुन Gopichand Padalkar यांचं टीकास्त्र

काळे झेंडे दाखवण्याच्या लायकीचे ठाकरे सरकार, ST कर्मचारी संपावरुन Gopichand Padalkar यांचं टीकास्त्र

| Edited By: | Updated on: Nov 16, 2021 | 4:45 PM

ऐन दिवाळीच्या तोंडावर सुरु झालेला एसटी कर्मचाऱ्यांचा संप अजूनही सुरुच आहे. मुंबईतील आझाद मैदानात शेकडो एसटी कर्मचारी गेल्या पाच दिवसांपासून आंदोलनाला बसलेले आहेत. भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोतही आझाद मैदानावर ठाण मांडून आहेत.

ऐन दिवाळीच्या तोंडावर सुरु झालेला एसटी कर्मचाऱ्यांचा संप अजूनही सुरुच आहे. मुंबईतील आझाद मैदानात शेकडो एसटी कर्मचारी गेल्या पाच दिवसांपासून आंदोलनाला बसलेले आहेत. भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोतही आझाद मैदानावर ठाण मांडून आहेत. परिवहन मंत्री अनिल परब, एसटी महामंडळाचे प्रतिनिधी, एसटी कर्मचारी प्रतिनिधी आणि भाजप नेत्यांमध्ये चर्चेच्या फेऱ्या सुरु आहेत. मात्र, अद्याप योग्य तोडगा निघून शकलेला नाही. या पार्श्वभूमीवर गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्ला चढवलाय. हे सरकार काळे झेंडे दाखवण्याच्याच लायकीचं असल्याची टीका पडळकर यांनी केलीय.