‘शासन दारी, तर उपमुख्यमंत्री घरी’, ‘या’ नेत्याने उडविली शिंदे सरकारची खिल्ली
अजित दादा गटच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्र सरकारवर नाराज आहे. दोन्ही उपमुख्यमंत्री येणार नव्हते तर मग आजचा शासन आपल्या दारी कार्यक्रम पुढे ढकलायला हवा होता.
नागपूर : 3 सप्टेंबर 2023 | बुलढाणा येथील शासन आपल्या दारी या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गैरहजेरी होती. यावरुन विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी शिंदे सरकारची खिल्ली उडविली आहे. शासन आपल्या दारी आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आपल्या घरी अशी टीका त्यांनी केली. दोन्ही उपमुख्यमंत्री किती दिवस कार्यक्रम टाळणार असा सवालही त्यांनी केला आहे. शिंदे सरकारने मराठा समाजाची माफी मागावी आणि हा प्रश्न सोडवावा. अजित दादा गटच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्र सरकारवर नाराज आहे, असे ते म्हणाले. दोन्ही उपमुख्यमंत्री येणार नव्हते तर मग आजचा शासन आपल्या दारी कार्यक्रम पुढे ढकलायला हवा होता असेही त्यांनी सांगितले.
Published on: Sep 03, 2023 08:59 PM
