सरकारने आता तरी किमाम समान कार्यक्रमावर काम करावं – Nana Patole

सरकारने आता तरी किमाम समान कार्यक्रमावर काम करावं – Nana Patole

| Edited By: | Updated on: Mar 30, 2022 | 4:58 PM

नाना पटोलेंनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रावरूनही उलटसुलट चर्चा सुरू आहेत. काही दिवसांपूर्वीच राज्य काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील यांच्या उपस्थित झालेल्या बैठकीतही काँग्रेस नेत्यांचा नाराजीचा सूर कायम असल्याची माहिती समोर आली आहे.

महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारमधील काँग्रेस आमदरांची (Congress Mla) अंतर्गत धुसफूस पुन्हा बाहेर आली आहे. कारण आता काँग्रेसच्या जवळपास 25 आमदारांनी थेट सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांना पत्र लिहीत भेटीसाठी वेळ मागितला आहे. हे आमदार सरकरमधील काँग्रेसच्याच मंत्र्यांवर नाराज असल्याच्या राजकीय चर्चा रंगू लागल्या आहेत. त्यामुळे आता महाविकास आघाडी सरकार संकटात आहे की राज्यात काँग्रेसच संकटात आहे? असा सवालही राजकारणात उपस्थित केला जाऊ लागला आहे. दुसरीकडे नाना पटोलेंनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रावरूनही उलटसुलट चर्चा सुरू आहेत. काही दिवसांपूर्वीच राज्य काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील यांच्या उपस्थित झालेल्या बैठकीतही काँग्रेस नेत्यांचा नाराजीचा सूर कायम असल्याची माहिती समोर आली आहे. काँग्रेसचे आमदार आणि काँग्रेसचे मंत्री यांच्यातच चांगला समन्वय नसल्याची तक्रार काही आमदरांची असल्याच्याही चर्चा आहेत. त्यामुळे आता सोनिया गांधी यांच्या निर्णयाकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे. काँग्रेस आमदारांच्या या पत्राबाबत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना विचारले असता, हा नाराजीचा भाग नाही. काँग्रेस आमदार केलेल्या कामाबाबत सोनिया गांधी यांना माहिती देतील, असे सावध उत्तर नाना पटोले यांनी दिली आहे. तर दुसरीकडे नाना पटोले यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून किमान समान कार्यक्रमाची आठवण करून दिल्याचीही माहिती समोर आली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत सर्व काही अलबेल आहे का? असा सवाल सहाजिकच राज्याच्या राजकारणात उपस्थित होत आहे. आधीही अनेकवेळा निधी आणि महामंडळाच्या वाटपावरून काँग्रेसची खदखद बाहेर आली आहे.

Published on: Mar 30, 2022 04:25 PM