Grampanchayat Election : 51 तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचं बिगुल वाजलं! 18 सप्टेंबरला मतदान, 19 सप्टेंबरला निकाल

| Updated on: Aug 13, 2022 | 6:29 AM

Maharashtra gram panchayat Elections 2022 : पावसाचं प्रमाण कमी असलेल्या 51 तालुक्यातील 608 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचं बिगुल वाजलं आहे.

Follow us on

मुंबई : ग्रामपंचायत निवडणुका (Election 2022) जाहीर झाल्या आहेत. 18 सप्टेंबरला ग्रामपंचायत निवडणुकांसाठी मतदान पार पडणार आहे. तर 19 सप्टेंबरला मतमोजरी होईल. एकूण 51 तालुक्यांमधील 608 ग्रामपंचायतींच्या सदस्या पदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांचा (Gram Panchayat Election) कार्यक्रम जाहीर करण्यात आहे. दरम्यान, या निवडणुका जाहीर होताच आचार संहिताही लागू करण्यात आलीय. सर्वोच्च न्यायालयानं (Supreme Court Orders) दिलेल्या निर्देशांनुसार पावसाचं प्रमाण कमी असलेल्या 51 तालुक्यातील 608 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचं बिगुल वाजलं आहे. या निवडणुकीत ग्रामस्थच आपला सरपंच निवडणार आहेत.
निवडणूक कार्यक्रम पुढीलप्रमाणे :
18 ऑगस्ट रोजी निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध होईल
24 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर पर्यंत अर्ज दाखल होणार
2 सप्टेंबरला अर्जांची छाननी
6 सप्टेंबर अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख
18 सप्टेंबर – मतदान
19 सप्टेंबर – मतमोजणी,निकाल