Mahatma Gandhi Death Anniversary | राजघाटावर महात्मा गांधीजींना राष्ट्रपती, पंतप्रधानांकडून अभिवादन
Mahatma Gandhi

Mahatma Gandhi Death Anniversary | राजघाटावर महात्मा गांधीजींना राष्ट्रपती, पंतप्रधानांकडून अभिवादन

| Edited By: | Updated on: Jan 30, 2022 | 2:09 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी आज राष्ट्रपिता महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांच्या 74 व्या पुण्यतिथीनिमित्त दिल्ली येथील राजघाटावर जाऊन आदरांजली अर्पण केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी आज राष्ट्रपिता महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांच्या 74 व्या पुण्यतिथीनिमित्त दिल्ली येथील राजघाटावर जाऊन आदरांजली अर्पण केली. नरेंद्र मोदी यांनी महात्मा गांधी यांच्या समाधीवर फुलं अर्पण करून आदरांजली वाहिली आहे. न्यूज एजन्सी एएनआयनं नरेंद्र मोदी यांचे फोटो शेअर केले आहेत. महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सायंकाळी पाच वाजता बिर्ला हाऊसला (Birla House) जाणार असून तिथे भजन कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. बिरला हाऊसमध्ये आजच्याच दिवशी 1948 मध्ये नथुराम गोडसे यानं महात्मा गांधींवर गोळ्या झाडल्या होत्या. महात्मा गांधी यांची पुण्यतिथी हुतात्मा दिवस म्हणून देखील साजरी केली जाते. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देखील राजघाटवर जाऊन महात्मा गांधी यांना अभिवादन केलं.

Published on: Jan 30, 2022 01:35 PM