Pahalgam Terror Attack : गुजरात ड्रग्स प्रकरणाचा पहलगाम हल्ल्याशी थेट संबंध?

Pahalgam Terror Attack : गुजरात ड्रग्स प्रकरणाचा पहलगाम हल्ल्याशी थेट संबंध?

| Updated on: Apr 29, 2025 | 4:46 PM

NIA on Lashkar-e-Toiba funding : गुजरातमध्ये जप्त केलेल्या ड्रग्सचा लष्कर-ए-तोयबाशी संबंध असल्याचं एनआयएने आज कोर्टात म्हंटलं आहे.

गुजरातमध्ये जप्त केलेल्या ड्रग्सचा लष्कर-ए-तोयबाशी संबंध असल्याचं एनआयएने म्हंटलं आहे. या ड्रग्सच्या व्यापारातून लष्कर-ए-तोयबाला आर्थिक रसद पुरवली गेली असल्याचं देखील एनआयएने म्हंटलं आहे. गुजरातच्या मुंद्रा बंदरात जप्त केलेल्या ड्रग्स प्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. या ड्रग्स प्रकरणात अटकेत असलेल्या हरप्रीतसिंग तलवारच्या जामिनाला एनआयएने विरोध केला आहे. गुजरातमध्ये जप्त केलेले 21 हजार कोटी रुपयांचे ड्रग्स आणि पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचे थेट संबंध असल्याचं एनआयएने कोर्टात म्हंटलं आहे.

Published on: Apr 29, 2025 04:46 PM