Gunratna Sadavarte : दहशतगिरी अन् झुंडशाही… मीरा-भाईंदरमधील मनसेच्या मोर्चावर सदावर्ते भडकले

Gunratna Sadavarte : दहशतगिरी अन् झुंडशाही… मीरा-भाईंदरमधील मनसेच्या मोर्चावर सदावर्ते भडकले

| Updated on: Jul 08, 2025 | 12:19 PM

अमराठी व्यापाऱ्यांच्या मीरा-भाईंदरमधील मोर्चाला प्रत्युत्तर देण्यासाठी मनसे आज मीरा-भाईंदर शहरात मोर्चा काढणार होते. मात्र त्यापूर्वीच पोलिसांनी मनसैनिकांची धरपकड करण्यात आली. या मोर्चावर काय म्हणाले गुणरत्न सदावर्ते?

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात मराठी भाषेचा मुद्दा पुन्हा तापल्याचे पाहायला मिळत आहे. मीरा भाईंदरमध्ये अमराठी व्यापाऱ्याला मारहाण झाल्याच्या नुकतीच घटना समोर आली होती. या घटनेच्या निषेधार्थ व्यापारी एकवटले आणि त्यांनी मनसेविरोधात अमराठी मोर्चा काढून मीरा भाईंदर बंद पुकारला होता. यालाच उत्तर देण्यासाठी आज मनसेकडून मीरा भाईंदरमध्ये मोर्चाची घोषणा कऱण्यात आली होती. मात्र पोलिसांनी या मोर्चाची परवानगी नाकारली. तरीही मनसेचे असंख्य आंदोलक रस्त्यावर उतरताच त्यांची पोलिसांकडून धरपकड करण्यात आल्याचे पाहायला मिळाले. यावरूनच वातावरण आणखी चिघळलंय. अशाचत वकील गुणरत्न सदावर्ते या मोर्चांवरून चांगलेच आक्रमक झालेत. ‘ही रस्त्यावर येणारी माणसं दहशतगिरीची आहेत. ही झुंडशाही आहे. त्यामुळे पोलिसांनी या दहशतगिरीला आणि झुंडशाहीला पायबंद घातला पाहिजे. तर केलेली कायदेशीर कारवाई अत्यंत योग्य आहे.’, असं सदावर्ते म्हणाले.

Published on: Jul 08, 2025 12:19 PM