Gunaratna Sadavarte : राज ठाकरेंची मुजोरी… एकेरी उल्लेख करत सदावर्तेंनी थेट बापच काढला, बघा काय केला हल्लाबोल?
'संस्कृती आणि विकृतीचा प्रश्न आहे. कोणाला तरी तुम्ही दलाल म्हणताय.', असं म्हणत गुणरत्न सदावर्ते यांनी मनसे नेते प्रकाश महाजन यांचा उल्लेख वयोवृद्ध असा केला. सदावर्ते म्हणाले त्यांच्याशी मला डोकं लावायचं नाही. त्यांचं काही शिल्लक राहिलं नाही, असं म्हणत गुणरत्न सदावर्ते यांनी प्रकाश महाजन यांच्यावर निशाणा साधला.
हिंदी सक्तीविरोधात मोर्चा काढणार असल्याची मोठी घोषणा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी मराठी भाषा टिकावी यासाठी मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी होण्याचे प्रत्येक मराठी माणसासह, राजकीय पक्ष, कलाकारांना आवाहन केले. ‘कोणताही झेंडा नसेल मराठी हा अजेंडा असेल. या अजेंड्यासाठी मराठी माणसांनी सहभागी व्हावं. सरकारला दाखवावं, कोण येणार नाही हेही मला पाहायचं आहे,’, असं वक्तव्य राज ठाकरेंनी करत एल्गार पुकारला होता. यासंदर्भात बोलताना गुणरत्न सदवार्ते यांनी राज ठाकरेंवर हल्लाबोल केला. ‘कालच्या पत्रकार परिषदेत राज ठाकरेंची मुजोरी पाहायला मिळाली. कोण येतं बघू म्हणजे तुझ्या बापाचा महाराष्ट्र आहे का? महाराष्ट्राचा सात बारा तुझ्यानावावर झालाय’, असं म्हणत सदावर्तेंनी एकेरी उल्लेख करत टीका केली.
Published on: Jun 27, 2025 02:19 PM
