Gunaratna Sadavarte : राज ठाकरेंचं वर्तन तालिबानी, ‘टन टन टोल’ म्हणत गुणरत्न सदावर्तेंनी पुन्हा डिवचलं

Gunaratna Sadavarte : राज ठाकरेंचं वर्तन तालिबानी, ‘टन टन टोल’ म्हणत गुणरत्न सदावर्तेंनी पुन्हा डिवचलं

| Updated on: Apr 18, 2025 | 6:41 PM

महाराष्ट्राच्या शाळांमध्ये हिंदी अनिवार्य, या शासनाच्या धोरणाला मनसेने विरोध दर्शवत मनसे चांगलीच आक्रमक झाली आहे. मनसेच्या काही कार्यकर्त्यांनी शासन निर्णयाच्या होळी केली तर दुसरीकडे या वादात आता गुणरत्न सदावर्ते यांनी उडी घेतली आहे.

‘राज ठाकरेंना कायदा कळतो की नाही असा प्रश्र उपस्थित होत आहे. राज ठाकरे यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण न वाचता, त्यांनी स्वत:ची राजकीय पोळी भाजण्यासाठी चालवलेला हा एक घाट आहे’, असं म्हणत गुणरत्न सदावर्ते यांनी राज ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे.  महाराष्ट्रातील शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी भाषा अनिवार्य करण्याच्या शासनाच्या निर्णयाविरोधात मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे. यावरून गुणरत्न सदावर्ते यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे. यावरून बोलताना सदावर्ते म्हणाले, हिंदी भाषेचा कायदा म्हणजे शासन निर्णय राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी दहन केलं आहे. ही कृती अत्यंत चुकीची आहे. म्हणून राज ठाकरे यांच्याविरोधात एफआयआर दाखल झाला पाहिजे, अशी मागणी गुणरत्न सदावर्ते यांच्याकडून कऱण्यात आली आहे. तर  स्वतःच्या फायद्यासाठी राज ठाकरेंनी भाषिक वाद घालण्याचा घाट घातला आहे. हे विदारक आहे. स्वातंत्र्यापूर्वी आणि नंतर देखील कोणी एवढं तालिबानी पद्धतीनं वागलं नसेल असं राज ठाकरे वागताय, असं म्हणत जिव्हारी लागणारी टीका सदावर्तेंनी केली. यावेळी टोलच्या मुद्यावरून देखील राज ठाकरेंना त्यांनी डिवचल्याचे पाहायला मिळालं.

Published on: Apr 18, 2025 06:41 PM