Gunratna Sadavarte :  पब्लिक को मंगता है…, ‘सैय्यारा’मुळं ‘येरे येरे पैसा’ला फटका, सदावर्तेंनी मनसेच्या खोपकरांना डिवचलं

Gunratna Sadavarte : पब्लिक को मंगता है…, ‘सैय्यारा’मुळं ‘येरे येरे पैसा’ला फटका, सदावर्तेंनी मनसेच्या खोपकरांना डिवचलं

| Updated on: Jul 26, 2025 | 11:46 AM

वकील गुणरत्न सदावर्ते यांनी अमेय खोपकर यांच्यावर निशाणा साधलाय. सदावर्ते हे त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात आणि विविध सामाजिक-राजकीय मुद्द्यांवर ते आपले मत मांडत असतात. अशातच 'येरे येरे पैसा ३' या चित्रपटावरून त्यांनी खोपकरांना डिवचलंय.

‘सैयारा’ या हिंदी चित्रपटामुळे ‘येरे येरे पैसा ३’ या मराठी चित्रपटाला थिएटर्समध्ये पुरेसे शोज, स्क्रिन मिळत नसल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे मराठी कलाकार आणि मराठी चित्रपट निर्मात्यांमध्ये नाराजी दिसतेय. हाच मुद्दा सध्या चर्चेत आहे. वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मनसे नेते आणि चित्रपट निर्माते अमेय खोपकर यांना त्यांच्या ‘येरे येरे पैसा ३’ या चित्रपटावरून डिवचलंय. यावरून गुणरत्न सदावर्ते यांनी त्यांच्यावर निशाणा साधत असे म्हटले की, ‘येरे येरे पैसा में इंटरेस्ट नही पब्लिक को मगता है इमोशनल लव्ह स्टोरी.. तुम्हारे स्टोरी में ताकद है तो पब्लिक डिमांड करेंगी नही है तो फिर कौन डिमांड करेगा’

‘सैयारा’ या हिंदी चित्रपटामुळे ‘येरे येरे पैसा ३’ या मराठी चित्रपटाला थिएटर्समध्ये स्क्रिन उपलब्ध होत नसल्याने अमेय खोपकर यांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, आपल्याच चित्रपटासाठी आंदोलन करणे त्यांना योग्य वाटत नाही, परंतु यापुढे जर कोणत्याही मराठी चित्रपटाला थिएटर्समध्ये असा त्रास झाला, तर मल्टीप्लेक्सच्या काचा फोडल्या जातील. महाराष्ट्रात मराठी चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी सरकार दरबारी याचना करावी लागणे हे दुर्दैवी असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

 

Published on: Jul 26, 2025 11:38 AM