Hafiz Saeed : हाफीज सईदला लादेनसारखा मारा अन् दहशतवाद्यांचा खात्मा…. अमेरिकेचा भारताला ग्रीन सिग्नल, बघा काय सूचवलं?

Hafiz Saeed : हाफीज सईदला लादेनसारखा मारा अन् दहशतवाद्यांचा खात्मा…. अमेरिकेचा भारताला ग्रीन सिग्नल, बघा काय सूचवलं?

| Updated on: May 03, 2025 | 12:29 PM

पाकिस्तान आणि भारत यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताने दहशतवाद्यांविरोधात अ‍ॅक्शन घ्यावी. ही अ‍ॅक्शन घेताना क्षेत्रिय युद्ध भडकू नये, याची काळजी घ्यावी, असं वक्तव्य अमेरिकेचे उपराष्ट्रपती जे.डी व्हान्स यांनी केलं होतं.

भारताने पाकविरोधात अनेक कठोर पाऊलं उचलल्यानंतर आता भारत पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक करेल याची धास्ती पाकिस्तानने घेतली असल्याचे पाहायला मिळाली आहे. अशातच पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक करण्यास अमेरिकेकडून भारताला ग्रीन सिग्नल दिलाय का? अशी चर्चा सुरू असताना पाकिस्तानच्या दहशतवाद्यांना शोधून खात्मा करावा, असं म्हणत अमेरिकेचा भारताला ग्रीन सिग्नल असल्याचे पाहायला मिळत आहे.

अमेरिकेनं लादेनला मारल्याप्रमाणे भारताचे विशेष दलही पाकिस्तानच्या माहितीशिवाय अशीच कारवाई करू शकतात.तर इस्रायलच्या धर्तीवर, भारत स्मार्ट ड्रोनच्या माध्यमातून दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त करू शकतो. यासह स्थानिक नेटवर्कचा वापर करून भारत पाकिस्तानातल्या दहशतवाद विरोधी नेटवर्कला सक्रिय करू शकतो. स्थानिक नेटवर्कचा वापर केल्याने जेणेकरून थेट युद्धात न अडकता दहशतवाद्यांचा खात्मा करता येईल. कोणताही पुरावा न ठेवता दहशतवादी नेटवर्क उखडून टाकण्यासाठी सर्जिकल स्ट्राईक केलं पाहिजे, असं अमेरिकेकडून सांगितले जात आहे.

Published on: May 03, 2025 12:29 PM