Headline | 12 PM | राज्यातील किनारपट्टी भागात NDRFच्या टीम सज्ज

| Updated on: Jun 10, 2021 | 1:34 PM

भारतीय हवामान विभागानं रायगड जिल्ह्यासाठी रेड अॅलर्ट जारी केला आहे. तर पुढील चार दिवसांसाठी कोकणातील सर्व जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अ‌ॅलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदूर्गसाठी ऑरेंज अ‌ॅलर्ट जारी करण्यात आला आहे.

Follow us on

कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात पावसाला सुरुवात झाली आहे. बहुतांशी भागात पाऊस पडत आहे. कोकण किनारपट्टीला आज काही ठिकाणी रेड तर काही ठिकाणी ऑरेंज अ‍ॅलर्ट जारी करण्यात आला आहे. येत्या चार ते पाच दिवसात संपूर्ण कोकण किनारपट्टीवर मुसळधार होणार आहे, असं हवामान खात्याच्या प्रादेशिक विभागाच्या प्रमुख शुभांगी भुते यांनी दिली सांगितलं.

भारतीय हवामान विभागानं उद्यासाठी रायगड जिल्ह्यासाठी रेड अॅलर्ट जारी केला आहे. तर पुढील चार दिवसांसाठी कोकणातील सर्व जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अ‌ॅलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदूर्गसाठी ऑरेंज अ‌ॅलर्ट जारी करण्यात आला आहे.