Maharashtra Flood : धाराशिव, बीड, जालन्यासह राज्यभरात पावसाचं थैमान, जनजीवन विस्कळीत, पूरग्रस्तांचं हेलिकॉप्टरनं रेस्क्यू

Maharashtra Flood : धाराशिव, बीड, जालन्यासह राज्यभरात पावसाचं थैमान, जनजीवन विस्कळीत, पूरग्रस्तांचं हेलिकॉप्टरनं रेस्क्यू

| Updated on: Sep 23, 2025 | 12:47 PM

महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसामुळे भीषण पूरस्थिती निर्माण झाली आहे. धाराशिव, बीड, जळगाव, जालना, सोलापूर आणि अहमदनगर जिल्ह्यांमध्ये पूर गंभीर आहेत. अनेक गावांचा संपर्क तुटला असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. हेलिकॉप्टर आणि बोटीद्वारे बचावकार्य सुरू आहे.

राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा कहर पाहायला मिळतोय. पूरस्थिती निर्माण झाल्याने अनेक गावांचा संपर्क तुटलाय पावसामुळे शेती पिकांचा सुद्धा प्रचंड नुकसान झाले आहे त्यामुळे बळीराज संकटात सापडला आहे. जळगाव, जालना, सोलापूर, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर जनजीवन विस्कळीत झालं आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसानं अक्षरशः हाहाकार माजवलाय. धाराशिव, बीड, जळगाव, जालना, सोलापूर, अहिलेनगर आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये पूरस्थिती गंभीर झाली आहे. अनेक गावांचा संपर्क तुटला असून शेतकऱ्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तर धाराशिवच्या परंडा तालुक्यातील देवगावात चांदणी नदीने रौद्ररूप धारण केले 25 ते 30 ग्रामस्थ घरांच्या पत्र्यावर अडकले होते यावेळी हेलिकॉप्टर आणि बोटीद्वारे त्यांचे रेस्क्यू ऑपरेशन करण्यात आलं.

Published on: Sep 23, 2025 12:41 PM