बदनापूर तालुक्यात अतिवृष्टी सदृश्य पाऊस; शेतांना आलं तळ्याचे स्वरूप
जालना जिल्ह्यात काल सर्वदूर जोरदार पावसाने हजेरी लावली.
जालना जिल्ह्यात काल सर्वदूर जोरदार पावसाने हजेरी लावली. 15 ते 20 दिवसाच्या विश्रांतीनंतर काल जिल्ह्याच्या विविध भागात पावसाचं जोरदार पुनरागमन झाले. काही ठिकाणी या पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला तर काही ठिकाणी शेतकऱ्यांची पिकं पाण्याखाली गेल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. बदनापूर तालुक्यातल्या अकोला गावात मध्यरात्रीच्या सुमारास मुसळधार पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांची मोसंबी डाळिंब या फळबागांसह खरीप हंगामात लागवड केलेल्या कपाशी आणि सोयाबीन ही पिके पूर्णतः पाण्या खाली गेल्याने या शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. दरम्यान एकीकडे हा पाऊस शेतकऱ्यांना दिलासादायक ठरला असला तरी दुसरीकडे मात्र या पावसाने हाहाकार करून शेतकऱ्यांचा प्रचंड नुकसान केलंय. त्यामुळे सरकारने तात्काळ नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करण्यात येत आहे.
