Vijay Wadettiwar चंद्रपूर दौऱ्यावर, नुकसानग्रस्त भागाच्या पाहणीसाठी शेतात पोहोचले-tv9

| Updated on: Aug 21, 2022 | 11:29 AM

ब्रह्मपुरी तालुक्यात किमान 25 हाडा हजार हेक्टर जमीन ही धानाची असून त्यापैकी किमान 18 हजार हेक्टर जमीन ही पूर्ण खराब झाली आहे. अतिवृष्टीमुळे आणि आलेल्या पुरामुळे शेती नष्ट झाली आहे.

Follow us on

राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे. याप्रश्नावर पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी विरोधकांनी सरकारला घेण्याचा प्रयत्न केला. तसेच शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. त्यादरम्यान आमदार विजय वडेट्टीवार हे चंद्रपूर दौऱ्यावर आहेत. पाहणीनंतर विजय वडेट्टीवार म्हणाले, ब्रह्मपुरी तालुक्यातील शेतकऱ्यांचे संपूर्ण जीवन उद्ध्वस्त झाल्याची सध्याची स्थिती आहे. ब्रह्मपुरी तालुक्यात किमान 25 हाडा हजार हेक्टर जमीन ही धानाची असून त्यापैकी किमान 18 हजार हेक्टर जमीन ही पूर्ण खराब झाली आहे. अतिवृष्टीमुळे आणि आलेल्या पुरामुळे शेती नष्ट झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू असून तो चिंताग्रस्त आहे.