Dharashiv floods : जिकडं नजर तिकडं पाणी, लोकं घरांच्या छतावर, हेलिकॉप्टरने अडकलेल्यांचं रेस्क्यू, धाराशिवच्या परंड्यात अतिवृष्टी

Dharashiv floods : जिकडं नजर तिकडं पाणी, लोकं घरांच्या छतावर, हेलिकॉप्टरने अडकलेल्यांचं रेस्क्यू, धाराशिवच्या परंड्यात अतिवृष्टी

| Updated on: Sep 22, 2025 | 1:17 PM

धाराशिवच्या परंडा तालुक्यात मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. देवगाव येथील 25 ते 30 ग्रामस्थ अडकून पडले असून, त्यांना घराच्या छतावर आश्रय घ्यावा लागला आहे. हेलिकॉप्टरच्या मदतीने त्यांचे रेस्क्यू सुरू आहे. पावसामुळे अनेक रस्ते बंद झाले आहेत.

धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यात सध्या जोरदार पाऊस पडत आहे. धाराशिवमध्ये होत असलेल्या मुसळधार पावसाने परिसरात पूरस्थिती निर्माण झाली आहे. देवगाव गावातील सुमारे 25 ते 30 नागरिक आपल्या घरांच्या छतांवर अडकून पडले आहेत. मुसळधार पावसामुळे रस्ते बंद झालेत घरात पाणी शिरलंय. त्यामुळे लोकं घराच्या छतावर जाऊन थांबलेत. प्रशासनाने या ग्रामस्थांच्या मदतीसाठी हेलिकॉप्टरद्वारे बचावकार्य हाती घेतले आहे. हेलिकॉप्टरच्या साह्याने अडकलेल्या लोकांना सुरक्षित बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. राज्याच्या अनेक भागांमध्ये पावसाचा जोर वाढला असून, पूर आणि नैसर्गिक आपत्तीची भीती व्यक्त केली जात आहे.

Published on: Sep 22, 2025 01:17 PM