Asia Cup 2025 : पाकच्या फरहानकडून गोळीबाराची वादग्रस्त अ‍ॅक्शन अन्… भारत-पाक मॅचमध्ये हायव्होलटेज ड्रामा

Asia Cup 2025 : पाकच्या फरहानकडून गोळीबाराची वादग्रस्त अ‍ॅक्शन अन्… भारत-पाक मॅचमध्ये हायव्होलटेज ड्रामा

| Updated on: Sep 22, 2025 | 11:58 AM

भारताने आशिया कपच्या सुपर फोर फेरीत पाकिस्तानवर सहा विकेट्सनी विजय मिळवला. सामन्यात शुभमन गिल आणि शाहीन अफ्रिदी यांच्यात तसेच अभिषेक शर्मा आणि हॅरिस रौफ यांच्यात वाद झाला. पाकिस्तानी खेळाडू साहिबजादा फरहानच्या वादग्रस्त सेलिब्रेशनमुळे वाद निर्माण झाला. या विजयामुळे भारताने पुढच्या फेरीत प्रवेश केला.

आशिया कप 2025 च्या सुपर फोर फेरीत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. भारताने पाकिस्तानवर सहा विकेट्सनी विजय मिळवला. शुभमन गिल आणि शाहीन अफ्रिदी यांच्यात तसेच अभिषेक शर्मा आणि हॅरिस रौफ यांच्यात मैदानावर तीव्र वाद झाल्याचे पाहायला मिळलं. शुभमन गिलने अफ्रिदीला बाऊंड्रीवर चेंडू घेण्यास सांगितले, तर अभिषेक शर्मांनी रौफच्या आक्रमक वर्तनावर नाराजी व्यक्त केली. पाकिस्तानच्या साहिबजादा फरहानने अर्धशतकानंतर केलेल्या वादग्रस्त अ‍ॅक्शन आणि सेलिब्रेशननेही खूप चर्चा सुरू झाली. त्यांच्या कृतीवर आयसीसीकडून कारवाईची मागणी होत आहे. भारतीय संघाने 172 धावांचे लक्ष्य सहजपणे गाठले आणि स्पर्धेत पुढील फेरीत प्रवेश केला.

Published on: Sep 22, 2025 11:58 AM