पोलीस भरती परीक्षेत हायटेक कॉपी? विद्यार्थ्यांचा आक्रमक पवित्रा, परीक्षा पुन्हा घेण्याची केली मागणी

| Updated on: May 28, 2023 | 8:35 AM

पोलिसांबद्दल तरुणांच्या मनात एक वेगळाच आदर असतो. लाखो विद्यार्थी पोलीस भरती परीक्षेसाठी अर्ज करतात. यापैकी काहींचे पोलीस होण्याचं स्वप्न पूर्ण होतं. परंतु काही जण गैरप्रकाराचा अवलंब करतात. मुंबई पोलीस भरती परीक्षेत हायटेक कॉपी प्रकरण समोर आले आहेत.

Follow us on

मुंबई : पोलीस कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात मदत करतात. दिवसरात्र आपले संरक्षण करतात. त्यामुळे पोलिसांबद्दल तरुणांच्या मनात एक वेगळाच आदर असतो. लाखो विद्यार्थी पोलीस भरती परीक्षेसाठी अर्ज करतात. यापैकी काहींचे पोलीस होण्याचं स्वप्न पूर्ण होतं. परंतु काही जण गैरप्रकाराचा अवलंब करतात. मुंबई पोलीस भरती परीक्षेत हायटेक कॉपी प्रकरण समोर आले आहे. 7 मे रोजी मुंबई पोलीस भरती लोखी परीक्षा पार पडली. या परीक्षेमध्ये हायटेक कॉपी झाल्याचा प्रकार उघडकीस आला होता. त्यानंतर विद्यार्थ्यांकडून या परीक्षेच्या संदर्भात प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले आणि ही परीक्षा पुन्हा घेण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. या पोलीस भरती प्रक्रियेमध्ये अनेक गैरप्रकार उघडकीस आलेले आहेत. या संदर्भात 22 मे ला या विद्यार्थ्यांकडून आझाद मैदानात एक दिवसीय आंदोलन सुद्धा करण्यात आलं. परंतु या आंदोलनाची दखल शासनाकडून घेण्यात आलेली नाही. हे विद्यार्थी गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील अनेक दिग्गज नेत्यांची भेट घेत आहेत. आझाद मैदानात या विद्यार्थ्यांना आंदोलनाकरिता परवानगी मिळत नसल्यामुळे हे राज्यभरातून आलेले विद्यार्थी आपली कैफियत सर्व पक्षीय नेत्यांच्या समोर मांडत आहेत.