Hinjewadi Fire : कामावरून घरी निघाले, रस्त्यातच अघटित घडलं अन् .. हींजवडीच्या अग्नितांडवाचा थरार
Pune Accident News : पुण्याच्या हींजवडी फेज 1मध्ये एका टेम्पो ट्रॅव्हलला लागलेल्या भीषण आगीत 4 कर्मचाऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. यात 6 कर्मचारी जखमी झाले आहेत.
ग्राफीक कंपनीच्या टेम्पो ट्रॅव्हलला लागलेल्या भीषण आगीत होरपळून 4 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला असल्याची धक्कादायक घटना पुण्याच्या हींजवडी फेज 1 मध्ये घडली आहे. यात एकूण 12 कर्मचारी होते. पैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे.
आज सकाळी 8 वाजेच्या सुमारास एका ग्राफीक कंपनीच्या 12-15 कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हलने अचानक पेट घेतला. सुरुवातीला या ट्रॅव्हलच्या पुढच्या भागात आग लागली. त्यानंतर पुढे बसलेल्या चालक आणि कर्मचाऱ्यांनी गाडीतून खाली उड्या मारल्या. मात्र मागे बसलेल्या कर्मचाऱ्यांकडून दरवाजा उघडला गेला नाही. आगीत हा दरवाजा लॉक होऊन गेला. त्यामुळे या आगीत होरपळून 4 कर्मचाऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. हे चार कर्मचारी इंजिनीअर असल्याची माहिती समोर आली आहे. ही आग इतकी भीषण होती की आग विझल्यानंतर या टेम्पो ट्रॅव्हलचा फक्त सांगाडाच याठिकाणी उरला आहे. आगीच कारण अजून समजलेल नाही.
