आनंद दिघे, बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे मुख्यमंत्री झालो- एकनाथ शिंदे
"आज मी मुख्यमंत्री झालो, त्यामागे धर्मवीर आनंद दिघे आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे आशीर्वाद आणि शुभेच्छा आहेत. जनतेच्या पाठिंब्यामुळे मी एवढ्या मोठ्या पदावर आहे."
“आज मी मुख्यमंत्री झालो, त्यामागे धर्मवीर आनंद दिघे आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे आशीर्वाद आणि शुभेच्छा आहेत. जनतेच्या पाठिंब्यामुळे मी एवढ्या मोठ्या पदावर आहे. आनंद दिघे यांच्या सानिध्यात मी अनेक वर्षे काम केलंय. त्यांचा आदर्श, त्यांची शिकवण, त्यांची कार्यपद्धती आजही माझ्या डोळ्यांसमोर आहे. त्यांच्या मनात ही भावना होती की, एके दिवशी ठाण्याचा माणूस हा मुख्यमंत्रीपदी असावा. या संधीचं सोनं करण्यासाठी मी अहोरात्र मेहनत करणार आहे. हे सर्वसामान्य लोकांच्या हिताचं निर्णय घेणारं सरकार आहे. गेल्या अनेक वर्षांपासूनचे प्रलंबित निर्णय आम्ही घेतले. हे निर्णय जनतेच्या हिताचे असतील”, असं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं.
Published on: Aug 26, 2022 03:19 PM
