Ajit Pawar : जो काही कारभार चालू आहे, या कारभाराचा मी ‘धिक्कार करतो’ अजित पवार

| Updated on: Sep 12, 2022 | 2:00 PM

माझ्याकडेच नियोजन खाता अनेक वर्ष होतं. त्यावेळेस आम्ही त्याचं नियोजन प्लॅनिंग फार व्यवस्थितपणे करायचं परंतु यांना कशामुळे वेळ लागतोय काही हे कळायला मार्ग नाही. असंही कानावर येतं की बाबा हिवाळी अधिवेशनापर्यंत मंत्रिमंडळाची वाढ कदाचित होणार नाही कारण आमदारांची नाराजी वाढेल पालकमंत्र्यांच्या बद्दल देखील एकेक जिल्ह्यामध्ये दोघ दोघे इच्छुक आहेत

Follow us on

शेतकरी शेवटी काय करणार . काही ठिकाणी एक- दोन गाई त्याच्या दारात असतात. त्यावरच तो स्वतःचा उपजवी का पार पाडत असतो. त्या लोकांच्यावर तर खूप मोठ्या संकट त्या ठिकाणी येणार आहे. सरकारने लक्षामध्ये घेतलं पाहिजे त्याचबरोबर आजपर्यंत आज 12 तारीख अजूनही पालकमंत्री(Guardian Minister) नेमले गेलेले नाहीत. उद्धव ठाकरे(Udhav Thackery) साहेबांनी राजीनामा दिला त्याच्यानंतर आज पर्यंत किती महिने झाले तुम्हाला माहिती आहे. दोन महिन्यापेक्षा जास्त काळ गेला तरी राजीनामा पालकमंत्री नेमले गेलेले नाहीत. मात्र सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले गेलेत नवीन पालकमंत्री आल्यानंतर ते डीपीडीसीच्या(DPDC) संदर्भामध्ये कसे पैसे खर्च करायचे कुठली काम घ्यायची? काय घ्यायची? आता तुम्ही मला सांगा सप्टेंबरपर्यंत अजून काहीच नाही, नंतर ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च फक्त सहा महिने राहतात. मार्च पर्यंत ते पैसे खर्च नाही झाले तर ते पैसे लॅपस होतात. माझ्याकडेच नियोजन खाता अनेक वर्ष होतं. त्यावेळेस आम्ही त्याचं नियोजन प्लॅनिंग फार व्यवस्थितपणे करायचं परंतु यांना कशामुळे वेळ लागतोय काही हे कळायला मार्ग नाही. असंही कानावर येतं की बाबा हिवाळी अधिवेशनापर्यंत मंत्रिमंडळाची वाढ कदाचित होणार नाही कारण आमदारांची नाराजी वाढेल पालकमंत्र्यांच्या बद्दल देखील एकेक जिल्ह्यामध्ये दोघ दोघे इच्छुक आहेत . पालकमंत्री कोणाला करायचं असाही एक्ष प्रश्न असा टोला अजित पवार यांनी राज्य सरकारला दिला आहे.