Ashish Shelar | माझी कोणाशीच गुप्त भेट झाली नाही : आशिष शेलार

Ashish Shelar | माझी कोणाशीच गुप्त भेट झाली नाही : आशिष शेलार

| Edited By: | Updated on: Jul 03, 2021 | 8:36 PM

शिवसेना-भाजप नेत्यांच्या भेटीगाठीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान, मी कोणाशीच गुप्त भेट घेतलेली नाही, असं आशिष शेलार यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना सांगितलं.

राज्यातील गुप्त भेटीचा सिलसिला आता शिवसेना-भाजपपर्यंत पोहोचल्याचं चित्र आहे. कारण शिवसेना खासदार संजय राऊत यांची आणि भाजप आमदार आशिष शेलार यांची भेट झाल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईतील नरीमन पॉईंट परिसरात दोन्ही नेत्यांची भेट झाली. या दोघांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा झाल्याचं सांगण्यात येत आहे. टीव्ही 9 मराठीच्या कॅमेऱ्यात दोन्ही नेत्यांच्या गाड्या कैद झाल्या आहेत. शिवसेना-भाजप नेत्यांच्या भेटीगाठीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान, मी कोणाशीच गुप्त भेट घेतलेली नाही, असं आशिष शेलार यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना सांगितलं.