सेनापती नसेल तर? आव्हाड यांच्या दाव्यानंतर राष्ट्रवादीची ठरली रणनीती

| Updated on: Feb 02, 2023 | 8:21 AM

आगामी ठाणे निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विरुद्ध राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड असा सामना रंगणार आहे. मात्र, या निवडणुकीत सेनापती नसेल तर निवडणूक कशी लढवावी असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसला पडला आहे.

Follow us on

ठाणे : राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड ( jitendr avhad ) यांनी एक मोठा दावा केला आहे. केंद्रातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी मला काही माहिती दिली आहे. यानुसार मला कधी अटक होऊ शकते असा दावा आव्हाड म्हणाले आहेत. आव्हाड यांनी केली दाव्यानंतर ठाण्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांची बैठक झाली. विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे यावेळी उपस्थित होते.

या बैठकीत राष्ट्र्रवादीच्या नेत्यांनी जितेंद्र आव्हाड यांना अटक झाली तरी पूर्ण ताकदनीशी ठाणे महापालिका निवडणूक लढायची, असा निश्चय केला. यावेळी अजित पवार यांनी नगरसेवकांना महत्त्वाच्या सूचना दिल्या. पालिका निवडणुकीच्या आधी शिंदे गटाकडून मोठ्या प्रमाणावर गट फोडण्यात येईल. पण, सावध रहा असा सल्ला नगरसेवकांना देण्यात आलाय. तर, सेनापती नसले तरी पूर्ण तयारीने निवडणुकीत उतरण्याची तयारी केली आहे असे राष्ट्रवादीचे नेते आनंद परांजपे यांनी सांगितले.