Kokan Monsoon Update : रत्नागिरीला ऑरेंज अलर्ट, पुढील दोन दिवस कसा होणार पाऊस, काय सांगतंय हवामान खातं?

Kokan Monsoon Update : रत्नागिरीला ऑरेंज अलर्ट, पुढील दोन दिवस कसा होणार पाऊस, काय सांगतंय हवामान खातं?

| Updated on: Aug 25, 2024 | 3:03 PM

मुसळधार पावसामुळे काजळी नदी सुद्धा दुथडी भरून वाहू लागली आहे. तर दुसरीकडे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. अशातच गेल्या दोन दिवसांपासून झोडपून काढणाऱ्या पावसाचा पहाटेपासून जोर ओसरल्याचे दिसतेय. बघा येणाऱ्या काही दिवसात कसा होणार पाऊस?

कालपासून रत्नागिरीमध्ये पावसाची चांगलीच बॅटिंग होतेय. मात्र आज पहाटेपासून मुसळधार पावसाने काहिशी विश्रांती घेतली आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने कोकण किनारपट्टी भागात सरींवर पाऊस बरसतो आहे. ज्याप्रमाणे ऑगस्ट महिन्यातील पहिल्या आठवड्यापासून पाऊस दडी मारून बसला होता त्याच पावसाने पुन्हा एकदा जोरदार एन्ट्री घेतली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे सर्वच नद्या दुथडी भरून वाहत आहेत. दरम्यान, पुढील दोन दिवस पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविली आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने मच्छीमारीला देखील ब्रेक मिळाला आहे. तर आज दिवसभर पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाजही हवामान खात्याने वर्तविला आहे. बघा रत्नागिरी जिल्ह्यात येणाऱ्या काही दिवसात कसा होणार पाऊस?

Published on: Aug 25, 2024 03:03 PM